किरकोळ अपघातावरुन एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला ! पुणे -सोलापूर रस्त्यावर उरुळीकांचन हद्दीतील प्रकार ..!!

उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामार्गावर चारचाकी गाड्यांचा किरकोळ अपघात झालेल्या कारणावरून तिघांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जानाई हॉटेलच्या समोरील चौकात मंगळवारी (ता. १६) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल संभाजी शितोळे (वय – ४०, व्यावसाय नर्सरी रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मुळ ता. हवेली) व सुमित संजय गुंड (रा. नानगाव ता. दौंड) असे मारहाण झालेल्या दोघांची नावे आहेत. तर या मारहाणीत शितोळे हे जखमी झाले आहेत. आकाष गव्हाणे, उमेष ढाके, निखील वाघमारे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) अशी मारहाण करणाऱ्या तिघांची नावे असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शितोळे हे घरी असताना शितोळे यांचा भाचा सुमित गुंड याने सांगितले कि, पुणे – सोलापूर महामार्गावरील जानाई हॉटेल समोरील चौकात माझ्या कारचा अपघात झाला असुन मला येथे जमलेले लोक मारत आहेत.
त्यानुसार दुचाकीवरून अपघात स्थळी गेलो असता त्या ठिकाणी भाऊ किरण शितोळे हा आगोदर पोहचला होता. त्यावेळी सुमित गुंड यास आवाज दिला व तुला कोणी मारहाण व शिवीगाळ केली असे विचारले. त्यावेळी त्याने तिघांकडे बोट दाखविले. यातील गव्हाणे हा रोडवरील अपघातातील गाडया बाजुला काढा असे म्हणु लागले असता फिर्यादी यांनी पोलीसांना येवु दया असे म्हणाले.
दरम्यान, आकाष गव्हाणे व त्याचे दोन मित्र जवळ येवुन त्यापैकी एकाने लोखंडी रॉड फिर्यादी शितोळे यांच्या डोक्यात मारला. त्यांच्या डोक्यातुन रक्त आले व चक्कर येऊन ते खाली बसले. यावेळी भाऊ किरण याने पुढील उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरु आहेत. शितोळे व त्यांचा भाचा सुमित गुंड याला मारहाण केल्याप्रकरणी वरील तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहेत.