संकष्टी चतुर्थीदशीला श्री चिंतामणीचरणी भाविकांचा ओघ! भाद्रपद द्वारयात्रेची सांगता…


लोणी काळभोर : श्रीगणेश चतुर्थी निमित्त थेऊर (ता. हवेली) येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी झाली होती.

आज पहाटे ५ वाजता मंदिर उघडण्यात आले. त्यानंतर अजय आगलावे यांनी श्रींचा अभिषेक व महापुजा केली. ते झालेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. भाद्रपद गणेश द्वारयात्रा निमित्ताने दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारांस थेऊर ग्रामस्थ व आगलावे बंधू यांनी श्रींची पालखी काढली. ती ग्रामदैवत महातारीआई मंदिरात पोहोचले नंतर तेथे पिरंगुटकर म़ंडळी यांनी पदे गायली. त्यानंतर ग्रामप्रदक्षिणा करुन पालखी परत चिंतामणी मंदिरात पोहोचली.

रात्री १० वाजण्याच्या सुमारांस पिरंगुटकर व उरुळीकर मंडळीनी मंगलमुर्ती देवाची पूजा केली. त्यानंतर आगलावे बंधू यांनी श्रीं चिंतामणीस महापोषाख घातला व पालखी काढली. यावेळी उपस्थितांनी गुलालाची उधळण करीत टिप-या खेळल्या. रात्रभर पदांचे गायन झाले नंतर सकाळी देवाची दृष्ट काढण्यात आली. व मटकी प्रसादाने ४ दिवसाच्या उपवासाची सांगता करण्यात आली.

       

यापुर्वी तिन दिवस अगोदर भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला थेऊर ग्रामस्थ व पिरंगुटकर देव मंडळी यांनी परंपरेनुसार भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून द्वारयात्रा काढली होती. यामध्ये सद्‌गुरू मोरया गोसावी महाराज यांच्या पूजेतील मूर्ती घेऊन पिरंगुटकर देव मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांतील पहिल्या दिवशी कोरेगाव मूळ येथील आसराई देवी, दुसऱ्या दिवशी आळंदी म्हातोबाची येथील ओझराई माता. तिसऱ्या दिवशी मांजरी येथील मांजराई माता येथे अनवाणी जाऊन आमंत्रण दिले. तर चौथ्या दिवशी थेऊर येथील महातारी आई, अशी द्वार यात्रा असते. बुधवारी दिनांक (२७ ऑगस्ट) रोजी ‘श्री चिंतामणी’ला अभिषेक व महापूजा केली व परंपरेप्रमाणे ‘श्री चिंतामणी’ला छत्तीस भोगांचा नैवेद्य दाखविण्यात येवून, श्री मोरया गोसावी ह्यानी रचलेली पदे म्हणून चिंतामणीचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी श्री चिंचवड देवस्थानचे विश्वस्त केशव विध्वंस उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!