Amol Khole : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर, अमोल कोल्हे यांनी जयंत पाटलांसमोरच केली घोषणा…


Amol Khole : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

अशातच मनसेकडून काही उमेदवारांची घोषणा देखील करण्यात आली आहे. तर आज शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेवेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी जुन्नर विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले, लोकसभा निवडणूक पार पडली आणि आता त्यानंतर जुन्नर विधानसभेचा उमेदवार कोण असणार? तुतारी फुंकणारा तो उमेदवार कोण? असं म्हणत आत्ताच्या आत्ता मी त्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करू का? यावेळी मंचाच्या खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंचावर असताना अमोल कोल्हे नेमक्या कोणाचं नाव जाहीर करणार अशी उत्सुकता शिगेला पोहचली. मात्र, तितक्यात कोल्हे मागे वळाले, जयंत पाटलांच्या शेजारी जाऊन, मोबाईल घेऊन परत माईक समोर आले.

ऐकायचं आहे का ते नाव? मग ऐका, हे नाव आहे, फक्त अन् फक्त शरद पवार साहेब अन त्यांचे विचार, त्यांच्या या बोलण्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. Amol Khole

पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवार हे फक्त व्यक्ती नाहीत तर ते विचार आहेत. शरद पवार हे तरूणांचा विचार आहेत, सर्वसामान्यांचा विचार आहेत, शेतकऱ्यांचा विचार आहेत. एक गोष्ट डोक्यात ठेवून आपल्याला पुढं जावं लागेल. नाहीतर दोन बोक्याच्या भांडणात माकडाचा लाभ होतोय असे काही होऊ देऊ नका असंही त्यांनी म्हटलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!