अमित शहा आज पुणे दौऱ्यावर, पालकमंत्रीपदाचा वाद मिटवणार, इच्छुकांकडून देव पाण्यात…


पुणे : देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीसाठी ते पुणे दौऱ्यावर आहेत. पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद शाह भूषवणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या सहयोगातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

गुजरात, गोवा, महाराष्ट्र या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या या परिषदेसाठी अनेकजण उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीत सदस्य राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक प्रत्येक राज्यातील दोन वरिष्ठ मंत्र्यांसह उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारने देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारी आणि स्पर्धात्मक संघवाद बळकट करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.
यामुळे विभागीय परिषदा दोन किंवा अधिक राज्ये किंवा केंद्र आणि राज्ये यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर नियमित संवाद साधण्यासाठी सहकार्य वाढवण्यासाठी हा एक मंच उपलब्ध आहे.

यामध्ये केंद्र आणि राज्ये यांच्यात अधिक सामंजस्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी संघवादाच्या दृष्टिकोनावर भर दिला आहे. दरम्यान, अमित शहा यांच्या या दौऱ्यात पालकमंत्री पदाचा वाद देखील सोडवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे हा दौरा महत्वाचा आहे.

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत सध्या जोरदार वाद महायुतीमध्ये आहे. गेला महिनाभर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटू शकलेला नाही. रायगडमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असल्याने मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, अशी शिवसेनेची भूमिका आहे.

तसेच दादाजी भुसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला नाशिकचे पालकमंत्रीपद देण्यात यावे, अशी शिवसेनेची मागणी आहे. दुसरीकडे, नाशिकमध्ये आमचे सर्वाधिक आमदार आहेत या न्यायाने राष्ट्रवादीला नाशिकचे पालकमंत्रीपद मिळावे, असं त्यांचे म्हणणे आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!