सहकार क्षेत्राचे अमित शहाच खरे तारणहार ! साखर ‘एमएसपी’ कायद्याने शेतकऱ्यांची उन्नती ; अजित पवार यांची शरद पवारांवर शहांपुढेच टिकेची झोड..


अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित सहकार कार्यक्रमात बोलताना सहकार क्षेत्राला नवा ऊर्जावान चेहरा देणारे केंद्रीय मंत्री अमित शहा यांच तोंडभरून कौतुक केल आहे. तर त्याचवेळी सहकार शाहांचे गौरव करताना त्यांनी नाव न घेता शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.

मंत्री अमित शहांच कौतुक करताना अजित पवार म्हणाले,सहकार चळवळीमुळे ग्रामीण भागात केवळ लक्ष्मीच नाही तर सरस्वतीदेखील नांदू लागली. शेतकऱ्यांच्या घरात शिक्षण आणि समृद्धी पोहोचवण्याचे मोठे काम सहकार संस्थांनी केले आहे. मात्र एका काळानंतर या चळवळीसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी अमित शाह यांच्या रूपाने महाराष्ट्राला आणि देशाला नव्या आशेचा किरण मिळाला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांच्या काळातील धोरणांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे.त्यांनी सांगितले की, आजवर कितीतरी राज्यकर्ते आले, पण साखरेचे भाव मात्र पडलेलेच असायचे. त्या काळी साखरेचे भाव फक्त १८०० ते २००० रुपयांपर्यंत मर्यादित असायचे. मात्र, एमएसपी लागू झाल्यापासून ३१०० रुपयांखाली साखर विकता येत नाही. हे उद्योगाला बळकटी देणारे ठरले आहे.

       

पुढे बोलताना अजित पवार यांनी विशेष नमूद केले की, शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला नवा श्वास मिळाला. “मॉलेसिसवर २८ टक्के कर होता, तो फक्त ५ टक्क्यांवर आणण्याचा दूरदृष्टीचा निर्णय अमित शाह यांनी घेतला. त्यांच्या पावलांमुळे नवीन संस्था उभ्या राहिल्या, नव्या संधी निर्माण झाल्या. ही पावले महाराष्ट्रातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देणारी ठरली आहेत. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा सल्ला दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!