Amit Shah : महायुतीकडून यावेळी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदे नाहीत? अमित शहांचे सर्वात मोठं वक्तव्य…


Amit Shah : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावरून चर्चा सुरू आहेत. तर, दुसरीकडे निवडणुकीनंतर सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण असणार याबाबत दोन्ही आघाड्यांकडून थेट भाष्य न करता सावध पवित्रा घेतला जात आहे.

दरम्यान, राज्यात निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यास विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पु्न्हा मुख्यमंत्री होतील की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांचे वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

जागा वाटपाच्या चर्चे दरम्यान अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून महत्त्वाचे वक्तव्य केले. आम्ही तुम्हाला मु्ख्यमंत्रीपद दिले. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला, असे वक्तव्य शहा यांनी केले असल्याचे समोर आले. त्यानंतर आता या निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महायुतीमध्ये भाजप १५५ ते १६० जागा लढवणार आहे. तर, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना उर्वरित जागा मिळणार आहे. सध्या महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी अटकळ बांधली जात होती. Amit Shah

मात्र, शिवसेनेतून बंडखोरी केलेले नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. आता, राज्यातील निवडणुका झाल्यानंतर भाजप नमतं घेणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर दावा करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!