लोकसभेसाठी दोन जागा द्या, राज्यातही मंत्रिपद हवे: रामदास आठवले..


छत्रपती संभाजीनगर : शिवसेना आणि भाजपला सत्तेत आणण्यात आरपीआयचा मोठा वाटा आहे. असे असले तरीही राज्यात आरपीआयचा एकही मंत्री नाही. त्यामुळे आमच्या पक्षाला राज्यात एक मंत्रिपद आणि लोकसभेसाठी दोन जागा द्याव्यात’, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली आहे.

ते म्हणाले, देशात भाजपला मोठे बहुमत असले तरी ‘एनडीए’चे सरकार म्हणून ओळखले जाते. तसेच राज्यातील गावागावांमध्ये कार्यकर्ते व पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे.

त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला एक मंत्रिपद द्यावे, या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी बोलणार आहे. लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!