महाविकास आघाडीत पुढचा मुख्यमंत्री होण्यासाठी मोठी डील ! अजित पवार गटाच्या प्रवक्तांचा आरोप ..!!

Supriya Sule : सध्या लोकसभा निवडणुका सुरू आहेत. यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभा निवडणुका सुरू असतानाच आता विधानसभा निवडणुकीच्या चर्चांनी चांगलाच जोरदार आहे. मागच्या काही दिवसापासून विधानसभा निवडणुकीवरून राजकीय नाट्याला रंग आला आहे. लोकसभा निवडणूक संपत नाही तोच राज्याच्या राजकारणातून अनेक मोठे गौप्यस्फोट बाहेर येऊ लागले आहेत. सध्या देखील एक मोठा गोप्यस्फोट समोर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गोप्यस्फोट केला आहे. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ठाकरे, गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यात मोठी डील झाली असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली महिला ही मुख्यमंत्री असावी असे स्वप्न शरद पवार यांचे होते. असा दावा देखील उमेश पाटील यांनी केला. यामुळे महाविकास आघाडी तयार केली आणि त्यानंतर पहिल्या अडीच वर्षात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद दिले त्यानंतर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद देणार होते अशी खळबळजनक माहिती उमेश पाटील यांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे.