राज्यातील सर्व अनुदानित खाजगी शाळा शासन घेणार ताब्यात…!


मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान देण्याबाबतच्या मागणीसाठी आमदार किरण सरनाईक, जयंत आसगावकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, अनुदानित शाळांच्या शिक्षकांचे वेतन सरकार देते; पण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतनही सरकार देणार असेल तर शाळाच शासनाच्या ताब्यात द्या.

 

 

 

शिक्षकांच्या वेतनावर ६६ हजार कोटी खर्च केले जातात. राजस्थान सरकार सर्व खासगी शाळा ताब्यात घेऊन चालवत आहे. त्याच धर्तीवर अनुदानित खासगी शाळा ताब्यात घेऊन राज्य सरकारनेच चालवाव्यात, असा विचार पुढे येत आहे. याविषयी मी माझ्या पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यासाठी तयार करेन, असा दावाही केसरकर यांनी यावेळी केला.

 

 

 

राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे म्हणाले, खासगी शाळा सरकार ताब्यात घेत असतील तर स्वागतच आहे; पण शाळा ज्या जागेवर आहेत त्या जमिनीचे, मालमत्तेचे पैसे सरकारने द्यावेत. यावर केसरकर यांनी अनुदानित शाळा लोकवर्गणी आणि सरकारने दिलेल्या जमिनीवर उभ्या राहिल्याचे सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!