सगळ्या प्रश्नांची उत्तरं 11 वाजता मिळणार! सुप्रीम कोर्टाकडे सर्वांचे लक्ष, सरकार पडणार की टिकणार..?


नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून शिंदे सरकारच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज सकाळी अकरानंतर जाहीर होणार आहे. यामुळे सर्वांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.

पहिला निर्णय दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली पोस्टिंगशी संबंधित वादावर आणि नंतर महाराष्ट्राचे उद्धव विरुद्ध शिंदे वादावर दिला जाईल. अशी माहिती समोर आली आहे.

माजी सरन्यायाधीश CJI अहमदी यांच्या स्मरणार्थ सर्वोच्च न्यायालय प्रथम सर्व न्यायाधीशांची बैठक घेणार आहे. म्हणजेच दोन्ही निर्णय 11 वाजल्यानंतरच येतील. यामुळे काहीसा वेळ देखील लागू शकतो.

एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला होता. त्यावर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सर्वौच्च न्यायालयात दाद मागितली होती.

त्यावरच आज निर्णय जाहीर केला जात असल्याने शिंदे सरकार जाणार की राहणार? राष्ट्रपती राजवट लागू होईल का? याबाबत कालपासून तर्क वितर्कांना उधाण आले आहे. यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज 11 नंतर मिळणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!