खोट्या सह्या करून आलिया भट्टची ७७ लाखांची फसवणूक, एक्स मॅनेजरला अटक, नेमकं काय घडलं?


मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टची फसवणुक करणाऱ्या तिच्या पर्सनल सेक्रेटरीला अटक करण्यात आली आहे. 5 महिने शोध घेतल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टची सेक्रेटरी वेदिका शेट्टीला बेंगळुरूमधून करण्यात अटक करण्यात आली आहे.

लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टची माजी व्यवस्थापक अर्थात मॅनेजर वेदिका शेट्टी हिला जुहू पोलिसांनी ७७ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. आलियाची आई सोनी राजदान यांनी वेदिका शेट्टीविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास पाच महिन्यांनी ही अटक करण्यात आली आहे.

पोलिस तपासात असे समोर आले की, वेदिकाने बनावट खर्च दाखवणारी बिलं तयार करून ती रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली. ती कंपनीसाठी किंवा वैयक्तिक गरजेसाठी खर्च दाखवायची, मात्र प्रत्यक्षात ते व्यवहार अस्तित्वात नव्हते. यासाठी तिने आलियाच्या खोट्या सह्या केल्याचाही गंभीर आरोप आहे. वेदिकाने हे सर्व अत्यंत नियोजनपूर्वक दोन वर्षांहून अधिक काळात केल्याचं उघड झालं आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तक्रार आलियाची आई सोनी राजदान यांनी जुहू पोलीस ठाण्यात दाखल केली होती. सुमारे पाच महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. वेदिकावर नजर ठेवून पोलिसांनी तिला बंगळुरूत अटक केली आणि न्यायालयात हजर केलं आहे. पुढील तपासासाठी पोलिसांनी तिची कोठडी मागितली आहे.

पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे वेदिका शेट्टीला बंगळूरुमधून अटक केली. तिला मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

जुहू पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. फसवणूक किती मोठी आहे आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आलिया भट्ट आणि तिच्या कुटुंबीयांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, बॉलिवूडमध्ये या घटनेमुळे चर्चेला उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!