अजितदादा राजकारणातील अमिताभ बच्चन, ते सर्वांनाच हवे असतात; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या, वाचा…

मुंबई : अजित पवार एक कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात काय होत आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येऊन सरकारमध्ये सहभागी व्हावे, अशी खुली ऑफर शिंदे गटाचे नेते दीपक केसरर यांनी अजित पवारांना दिली. त्यावर राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या , अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. त्यामुळे ते सर्वांनाच हवे असतात. यात वाईट काय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राज्यात करोडो रुपयांच्या जाहिराती कोण देत आहे, याचा शोध मी आणि अजित पवार घेत आहोत.
परंतु अजूनही कोणताच हितचिंतक आम्हाला मिळाला नाही. असा हितचिंतक सापडला तर तुमचे आणि आमचेही भले होईल. जर तुम्हाला असे हितचिंतक सापडले तर त्यांना आमचा फोन नंबर द्यावा, असा टोला राज्य सरकारला त्यांनी म्हंटल्या आहेत.
जर सत्तेत असणारे नेते जाहिराती आणि बॅनरबाजी करत असल्यास राज्याचे काम कुठे चाललले आहे ते यावरून दिसत आहे. महिलांच्या सुरक्षेकडे केंद्र आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे अशी टीका सुळे यांनी केली.
दीपक केसरकर यांची अजित पवारांना ऑफर
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. अजितदादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्यांने घेते, सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्या बरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे, असं सांगतानाच दादांनी पण सरकारमध्ये यावे ही आमची अपेक्षा आहे, असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर अजित पवार यांच्याबद्दल मला अतिश आदर आहे. दादा विरोधी पक्षाचे नेते आहेत. ते जबाबदार नेते आहेत. त्यांनी बेजबाबदार विधाने करू नये. संजय राऊत सारखे लोक रोज बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र अजितदादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्यांने घेते, असंही केसरकर म्हणाले आहेत.