दौंड कलाकेंद्र गोळीबारप्रकरणी अजित पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…


दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील बहुचर्चित कला केंद्रावर गोळी बार झाल्याची घटना नुकतीच समोर आली. तसेच आता दौंड तालुक्यातील वाखरी गावच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्रात २१ जुलै ला मध्यरात्री झालेल्या गोळीबार प्रकरणातील चारपैकी तीन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

तसेच या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला आमदाराचा भाऊ पोलिसांनी अटक केला असून चंद्रकांत मारणे हा मात्र अद्याप सापडलेला नाही. यात एका आमदाराच्या नातेवाइकाचा सहभाग असल्याचा आरोप होत असून, यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः स्पष्टता दिली आहे.

दरम्यान, अनेक माध्यमांमध्ये जखमी डान्सरबद्दल बातम्या झळकल्या होत्या. मात्र अजित पवार यांनी अधिकृत माहिती देताना सांगितलं की, या घटनेत कोणतीही महिला जखमी झालेली नाही. त्यांच्या मते, गोळीबार पाहून एका महिलेला चक्कर आल्याने ती क्षणभर बेशुद्ध झाली होती. तिला पाणी देऊन शुद्धीवर आणण्यात आले. कोणालाही गोळी लागलेली नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

अजित पवार म्हणाले, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींकडे शस्त्र परवाना होता का? याचाही तपास होणार आहे. तसेच मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो का, याचीही चौकशी करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!