शरद पवारांच्या भेटीवर अजित पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, मी लपून…..

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुण्याच्या बैठकीचं काही मनावर घेऊ नका.
पवार साहेब हे आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, मी बैठकीला गेलो हे मान्य करतो. पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच असे अजित पवार यांनी सांगितले.
पुण्याच्या बैठकीमुळे कोणताही संभ्रम नाही. शरद पवारांनी स्वत: सांगितले की ते पवार कुटुंबातले ज्येष्ठ आहेत. मी त्यांचा पुतण्या लागतो. घरातल्या व्यक्तीला भेटणं यात विनाकारण त्याला वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी दिली जात आहे. तिथे फार काही वेगळे घडले असे समजण्याचे कारण नाही, असही अजित पवार यांनी सांगितले.
बैठकीला लपून गेल्याची चर्चा असल्याबाबत विचारणा केली असता अजित पवार यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. मी तिथे भेटायला लपून गेलो नाही. मी उजळ माथ्याने फिरणारा कार्यकर्ता आहे.
मला काय गरज आहे लपूवन जायची? मी कुणाच्या घरी गेलो, तर मी तिथून कधी बाहेर निघायचं हा माझा अधिकार आहे. मी बैठकीला गेलो हे मान्य करतो ना मी, असं अजित पवार म्हणाले.