पुण्यातील मोंढवा जमीन प्रकरणातील’ त्या’ व्यवहारावर अजित पवारांचा मोठा दावा, म्हणाले..


पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणातील कुलमुखत्याधारक शीतल तेजवानी यांनी 300 कोटींच्या जमिनींच्या व्यवहारापोटी पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीकडून एक रुपया न घेता व्यवहार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा दावा केला आहे.1 रुपयांचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा काय कागद तयार होऊ शकतो हे आजपर्यंत मला कळलेलं नाही. मी पण आश्चर्यचकीत झालो. ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने ही नोंदणी केली, त्याने अशी नोंदणी कशामुळे केली. काय असं घडलं की त्यानं चुकीचं काम केलं असा सवाल करत याविषयीची वस्तूस्थिती आपल्याला एका महिन्यात कळेल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणात प्रशासकीय यंत्रणेकडे त्यांनी थेट बोट दाखवले आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत घेतले आहेत, त्यामुळे महिन्याभरात वस्तूस्थिती समोर येईल. निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप सुरु होतात. कुठूनतरी, काहीतरी असं काहीतरी बाहेर आणलं जातं. तुम्हाला आठवत असेल तर 2008 अथवा 2009 मध्ये असंच माझ्याविरोधात 70 हजार कोटींचा आरोप झाला. त्याला 15-16 वर्षे लोटली. त्यातून कुणीही काहीही पुरावे देऊ शकलं नाही. पण आमची बदनामी झाली. आता ही निवडणूका तोंडावर असताना पुन्हा असे आरोप केले जात आहेत.

दरम्यान पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीमार्फत जमीन खरेदी व्यवहार रद्द झाला असला तरी त्याअनुषंगाने बरेच महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यावर अजित पवार यांनी आपल्यावरही अगोदरच असेच आरोप झाले त्यातून काही निष्पन्न झालं नाही. मात्र बदनामी झाल्याचं शल्य दादांनी बोलून दाखवले. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत बारामती आणि आसपासच्या निवडणूक कार्यक्रमाचा आढावा त्यांनी बारामतीत बोलताना मांडला. या प्रकरणात आता आणखीन काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!