असले धंदे बंद करा! एकनाथ शिंदेंच्या पुणे दौऱ्याबद्दलचा प्रश्न ऐकताच अजित पवारांचा संताप, म्हणाले…


पुणे : पुण्यात शिवसेनेचा भगवा फडकवायचाय, अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पुणे दौऱ्यात केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ते भडकले. माहिती पोहोचवणे हे माध्यमांचे काम आहे, असे सांगतानाच तारतम्याने बातम्या द्या, जरा सबुरी ठेवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे.

पुण्यासह राज्यात घडत असलेल्या विविध घडामोडींवर अजित पवारांनी भाष्य केलं. त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे दौऱ्यात केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

पुणे भगवं करायचंय. पुण्यात भगवा फडकवायचाय, असं शिंदे म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार काहीसे भडकले. ‘तुम्ही लावालाव्या करायचं बंद करा, हे असले धंदे बंद करा. खऱ्या बातम्या द्यायला शिका, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. आम्हाला राज्यातील जनतेनं मोठं बहुमत दिले आहे. पण त्याच बरोबर प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यामुळे ते जातील तिथे तसं म्हणणार. भगवा करायचा म्हणाले ना? पुणे जिल्हा भगवा करायचा असंच म्हणाले ना? ते महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात गेल्यावर तसं सांगू शकतात. त्यात वावगं काहीच नाही, असं अजित पवार म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!