अजित पवार चार महिन्यांत तुरुंगात जाणार, शालिनीताई पाटलांचा मोठा दावा….
सातारा : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी पुन्हा पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील, असा दावा पाटील यांनी केला आहे.
शालिनीताई पुढे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदेदेखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतील.
कारण, एकनाथ शिंदे पक्ष फोडून बाहेर पडले आहेत. ते शिवसेनेच्या, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडून आले आहेत. ते केवळ सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. परंतु, त्यांना सरकार चालवता येत नाही.
अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाबरोबर गेल्याची चर्चा सातत्याने होत आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर शालिनीताई म्हणाल्या, तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभे राहता येणार नाही. पुढच्या चार महिन्यांत अजित पवार तुरुंगात जातील.
त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. अजित पवार तुरुंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायलाही कोणी जाणार नाही. असं देखील त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे.