Ajit Pawar : …त्यांच्या घरी आयाबहिणी नाहीत का? अजित पवार नेमकं कोणावर संतापले, जाणून घ्या…


Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अजितदादा अमरावतीत आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलंच फटकारले.

आता तुम्ही नवनीत राणा यांना मतदान करा. आम्ही जर तुमचे कामे केले नाही तर आम्हाला विधानसभेमध्ये उभे करू नका. आम्हाला चले जावे म्हणा, असे सांगतानाच विरोधक नवनीत राणा यांच्यावर आरोप करतात. जे आरोप करतात त्यांच्या घरी आईबहिणी नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केला.

संविधानाच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले आहे. बाबासाहेबांनी या देशासाठी उत्तम संविधान दिलं असून जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नाही. सांगायला काही नाही म्हणून घटना बदलणार असल्याचं विरोधक सांगत आहेत, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. Ajit Pawar

अजित पवार पुढे म्हणाले की, आम्ही २०१४ मध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. तसेच त्यांना आम्ही 2019 मध्ये पाठिंबा दिला. आताही आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आगामी निवडणुकीत तुम्ही नवनीत राणा यांना मतदान करा.

समजा आम्ही जर तुमचे कामे केले नाही तर आम्हाला विधानसभेमध्ये उभे करू नका. आम्हाला चले जावं म्हणा, असं सांगतानाच विरोधक राणा यांच्यावर आरोप करतात. जे आरोप करतात त्यांच्या घरी आईबहिणी नाही का?” असा परखड सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!