राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई : राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.
अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार विरोधी पक्षनेताचा राजीनामा अगोदर देणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवारांकडे २५आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला विरोधीपक्षनेते पद नको आता संघटनात्मक जबाबदारी हवी असं म्हणत नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली आणि त्यानंतर चर्चा सुरु झाल्या.