अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका, भाजप नेत्याची पोलिसांत तक्रार, पुण्यात खळबळ…!

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपाचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे.
अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजून काही कारवाई केली नाही. या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय पोलीस घेणार आहे.
गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश दिले आहे. त्यानंतरही या प्लॉटची मोजणी केली जात होती. हा प्लॉट रवींद्र साळगावकर यांच्याकडे आहे.
यामुळे त्यांना सतत धमकी येत आहे, असे साळगावकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी अजित पवार यांच्यांकडून अद्याप काही स्पष्टीकरण दिले गेले नाही. यामुळे मात्र चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हंटले आहे. यासंदर्भात पोलिस तपास करत आहेत. अजूनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. रवींद्र सळगावकर यांनी त्यांच्या लेटर हेडवर तक्रार लिहून खडक पोलिसांना दिली आहे. पुढील तपास, कारवाई पोलिस करतील.