Ajit Pawar : अजित पवारांच्या समर्थकांचा दादांना घरचा आहेर!! पत्र लिहून म्हणाले तुम्ही माफी मागून मोकळे झाला, पण आम्ही वाईट ठरलो….


Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्शभूमीवर लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तोंडावर बारामतीत अजित पवार समर्थकाचं एक पत्र व्हायरल झालंय. भावनिक राजकारण न करण्याचा सल्ला देणारे अजित पवारच भावनिक कार्ड का खेळतायत. असा प्रश्न यातून विचारण्यात आला आहे. Ajit Pawar

पत्रात नेमकं आहे काय?

पत्रात म्हटलंय की, दादा बरे आहात का. हल्ली तुमची काळजी वाटते. दुर्देव आहे की हे पत्र नाव न लिहिता लिहावे लागतंय. कारण नाव कळालं तर पुढे राजकारणात भविष्य राहिल की नाही, हा प्रश्न आहे. आजकाल तुमचं वागणं-बोलणं-सांगणं आणि ऐकणंही बदललंय.

जाहीर सभेत चूक झाली म्हणून कबुली देताय, कधी खदखद व्यक्त करताय, कधी भावनिक होताय, की सहानुभूतीचं कार्ड खेळताय? तुम्ही माफी मागून मोकळे झालात, पण आम्ही पवारसाहेबांच्या लेखी वाईट ठरलो.

आता आम्ही कुणाची माफी मागायची हे सुद्धा सांगा. तुमच्या निर्णयामुळे दोन गट पडले. त्यात तुम्ही माफी मागून आमचीच पंचाईत केली. याआधी सुनेत्रा पवारांच्या पराभवाची जबाबदारी स्वतः घेत कुणाचाही दोष नसल्याचं अजित पवार म्हणाले होते., नंतर मात्र बारामतीत इतकं काम करुनही पराभव झाला., अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली होती.

त्यावरुन पत्रात लिहिलंय की., वहिणींच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सर्व जबाबदार आहोत, अशी तुमची भावना झालीय. त्यामुळे कार्यकर्त्यांनाकडे तुम्ही संशयानं पाहणं सहन होत नाही. आम्ही पायाला भिंगरी लावून वहिणींचा प्रचार केला, हे तुम्हाला कसं पटवून देवू. आमची अवस्था ना घर की ना घाट की झाली.

ज्या पवारसाहेबांमुळे आम्हाला ओळख-पदं मिळाली, त्यांना तुमच्यासाठी धोका देवून आम्हाला काय मिळालं? तुम्ही हतबल का झालात, कसलं ओझं आहे. गुलाबराव , तानाजी सावंत तुमच्याबद्दल काहीही बरळतायत. त्यावर न बोलता तुम्ही आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याचं वाईट वाटतंय. पराभवाची सल आम्हालाही आहे. पण जास्त ताणू नका. जोमाने कामाला लागून पुन्हा बारामतीचा गड काबीज करुयात…

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!