Ajit Pawar : अजित पवारांनी केला प्रचाराचा श्रीगणेशा!! सर्व नेत्यांसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन…

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे आमदार मंत्री उपस्थित होते. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावाती दौरे सुरु करणार असल्याने त्याची सुरुवात म्हणून आज सिध्दीविनायकाचे दर्शन घेतल्याची माहिती अजित पवारांनी दिली.
आज सकाळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री व पदाधिकारी पक्ष कार्यालयात एकत्र जमून बसने श्री सिध्दीविनायकाच्या दर्शनाला दाखल झाले. सिध्दीविनायकाने आम्हाला आशिर्वाद द्यावेत त्यासाठी विजयाची खूण दाखवली आहे, असेही अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.
ते म्हणाले, शेवटी जनता – जनार्दन सर्वकाही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत. चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते. आज अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे. Ajit Pawar
१४ जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात आज केल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. राज्यात काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. यामुळे भाजप, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार गटाची जोरदार तयारी सुरु आहे.
सध्या हे सर्व पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी जोमाने तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आगामी काळात त्यांना किती यश मिळणार हे लकरच समजेल.