Ajit Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मोठा दावा, म्हणाले, बारामतीत अजितदादा ४० हजार मतांनी…


Ajit Pawar : राज्यभरात काल २८८ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच अनेक एक्झिट पोल्स समोर आले. या पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र, काही मतदारसंघांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले. लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये देखील पवार विरुद्ध पवार अशी लढत झालेला बारामती मतदारसंघ सध्या सर्वत्रच चर्चेचा विषय ठरला आहे.

अशातच बारामती बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरसचे उमेदवार उत्तमराव जानकर यांनी बारामती मतदारसंघाबाबत आणि अजित पवारांच्या विजयाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे, ते सध्या ते चांगलंच चर्चेत आलं आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव होईल. कारण अजित पवारांना मत म्हणजे भाजपला मत, अजित पवारांना मत म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मत आहे. Ajit Pawar

ते पुढे म्हणाले की, बारामती तालुका काय एवढा सोपा नाही. राज्याचं नेतृत्व केलेला हा तालुका आहे. त्यामुळे युगेंद्र पवार यांचा विजय निश्चित आहे, असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माळशिरस मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी केला आहे.

उत्तम जानकर यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. त्यानंतर काल मतदानादरम्यान जानकर यांनी अजित पवार पराभूत होतील, असा दावा केला आहे. तसंच राज्यात महाविकास आघाडीच्या १८० ते २०० जागा निवडून येतील आणि आमचंच सरकार स्थापन होईल, असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!