Ajit Pawar : निवडणुकीआधी अजित पवारांची बारामतीकरांना साद; म्हणाले, आता तुमच्या…

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज ही यात्रा अजित पवारांच्या बारामती मतदारसंघात आहे. भर पावसात अजित पवारांची जन सन्मान यात्रा सुरु आहे. अजित पवारांनी बारामतीत रोड शो केला. तेव्हा अजित पवारांचे शेकडो समर्थक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी या रॅलीत सहभाही झाले होते.
रोड शो नंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांनी बारामतीकरांना संदेश दिला. त्यांनी म्हटलं की, आता पुढच्या कामांचं नियंत्रण तुमच्या हातात आहे. बारामतीत विकासाच्या नवीन योजनांची सुरुवात होत आहे, आणि तुम्हीच ठरवणार आहात पुढचं काय करायचं आहे. Ajit Pawar
सभेत अजित पवारांनी बारामतीसाठी खास योजना जाहीर केल्या. बारामतीस सर्वात जास्त विकासनिधी देण्यात आले आहेत आणि लवकरच येथे कॅन्सर हॉस्पिटल सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी भ्रष्टाचारावरील आरोपांना खंडन करत सांगितलं की, महायुतीचे सरकार आले तरी योजना सुरू राहतील. गरिबी भोगल्यामुळे आम्हाला प्रत्येक पैशाची किंमत माहीत आहे.
दरम्यान, महिलांवरील अत्याचारांवरही त्यांनी भाष्य करत, “बारामतीत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी. बारामतीतील मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे अजित पवारांनी स्पष्ट केलं. बारामतीची शिक्षणाची गुणवत्ता आणि पोलिसांवरील दबाव यावरून त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे.