Ajit Pawar : अजित पवारांना अटक करा! नेत्याने थेट मोदींना पत्र लिहिल्याने उडाली खळबळ…

Ajit Pawar : सिंचन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अटक करा, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी केली आहे. अभिजीत बिचुकले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे.
कारवाई करा अन्यथा अजित पवारांची माफी मागा, अशी मागणी अभिजीत बिचुकले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. बिचुकले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, जर तुम्ही सुजान पंतप्रधान असाल, तर कृपया अजित पवारांवर कठोर कारवाई करा. त्यांनी या कारवाईसाठी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या पूर्वीची वेळ दिली आहे, जेणेकरून त्यांचे उमेदवारी चिन्ह घोषित होईपर्यंत हा मुद्दा हाताळला जावा. Ajit Pawar
पत्रात बिचुकले यांनी अजित पवारांवर १९९१ पासून सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी, सत्तेत आल्यानंतर अजित पवारांना अर्थ खाते आणि अर्थमंत्री पद देण्यात आले असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. हे जनतेच्या मतांची कुचेष्ठा नाही का?” असा सवाल त्यांनी केला आहे, ज्यामुळे हा मुद्दा अधिक गहन झाला आहे.
बिचुकले यांनी पत्रात अजित पवारांवर कारवाई न झाल्यास देवेंद्र फडणवीसांचे कान धरण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बिचुकले यांच्या या मागणीने अजित पवार यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही चिंतेत पडले आहेत. अजित पवार यांच्यावर कारवाई होईल का, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.