Ajit Pawar : मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत, म्हणाले ‘ते’ नक्कीच होणार….

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेकदा उपमुख्यमंत्री झाले मात्र त्यांना अजून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली नाही. यामुळे त्यांच्या समर्थकांनाही वाटते की दादांनी मुख्यमंत्री व्हावे. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील अनेकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
असे असताना त्यांनी कर्जत मधल्या सभेत केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.ते म्हणाले, आधी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर तुमच्या मनात काय आहे ते होईल. असं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.

यामुळे पुढच्या सरकारमध्ये अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. Ajit Pawar


दरम्यान, रायगड मधील कर्जतमध्ये राष्ट्रवादीची निर्धार सभा पाडली पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना ते मुख्यमंत्री व्हावेत असं सतत वाटते आता यावर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार बोलत असताना काही तरुण घोषणा देत होते. यावर आधी लोकसभेची निवडणूक आहे. त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल असे अजित पवार म्हणाले आहेत. यामुळे कार्यकर्ते देखील सुखावले आहेत.