Ajit Pawar : आम्हाला निवडून देणार असाल तर ५ वर्षात ९० हजार रुपये देणार, अजित पवारांचे लाडक्या बहिणींसमोर मोठं वक्तव्य..


Ajit Pawar : महायुती सरकारने आज पुण्यातील बालेवाडीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेतला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. या योजनेवरून त्यांनी विरोधकांवर टीका केली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुढच्या पाच वर्षांमध्ये लाडक्या बहिणींना ९० हजार रूपये देण्याचं काम आम्ही करणार आहे, फक्त पुढच्या पंचवार्षिकला आम्हाला निवडणून द्या असेही ते म्हणालेत आहे.

आपल्याला सातत्य टीकवायचे आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवत असताना पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला संधी द्या, पुन्हा आम्हाला पाठवळ द्या, आम्ही तुमच्या खात्यात पुन्हा एकदा ९० हजार रूपये देण्याचं काम करू. आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्ही वेळ मारून नेणारे नाहीत. जे बोलतो ते करतो, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहे.

अख्खा महाराष्ट्र लाडक्या बहिणीमय झाला आहे, आमच्या मनात काही वेगळी भावना नव्हती अर्थ संकल्प मांडताना आमची बहीण, महिला सक्षम झाली पाहिजे असं आम्हाला वाटत होते. विरोधक कारण नसताना टीका करत आहेत. विरोधक फक्त बहिणीकडे लक्ष दिले असे म्हणतात, मात्र भावाकडेही आम्ही लक्ष दिले आहे. Ajit Pawar

यापुढे कुणीही लाईट भरू नये, कोण तुमची लाईट कट करायला येत तेच बघतो, हे भावासाठी केले आहे. काहीजण कोर्टात गेले, पण कोर्टात टिकले नाही, मग काय करायच असे विरोधकांना वाटायला लागले असा हल्लाबोल अजित पवारांनी विरोधकांवर केला आहे.

तर या योजनेचे सातत्याने टिकवायचे आहे, त्यासाठी महायुतीला पाठबळ द्या. पुढील पाच वर्षात ९० हजार रुपये मिळणार आहेत लोकसभा निवडणुकीत असच खोटं बोलून नेरेटिव्ह सेट केला गेला. मात्र त्याला तुम्ही बळी पडू नका असे आवाहन देखील यावेळी अजित पवारांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!