Ajit Pawar : माझ्यात धमक आहे, खरंच सांगतो वयाच्या ८०-८५ वाल्यांनी थांबलेच पाहिजे! अजित पवारांचा शरद पवारांना टोला..


Ajit Pawar : राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ‘हाय प्रोफाईल ड्रामा’ सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ताब्यात घेण्याच्या लढाईत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांच्यात टीका टिप्पणी सुरु आहे.

दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आपला गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असे देखील सांगितले जात आहे. यामध्येच आता अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सगळीकडे त्यांच्या विधानाची चर्चा आहे.

अजित पवार म्हणाले, मी जे बोलतो ते वस्तुस्थितीला आधारित असते. परखडपणे बोलण्याची माझ्यात धमक आहे. खरंच सांगतो वयाच्या ८०-८५ वाल्यांनी थांबलेच पाहिजे. त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना नाव न घेता लगावला आहे. शिकच्या कालिदास कलामंदिर येथे ”सुविचार मंच”तर्फे सुविचार गौरव पुरस्कार वितरण पार पडला त्यावेळी अजित पवार बोलत होते. Ajit Pawar

ते पुढे म्हणाले. मी वस्तुस्थितीशी बोलणारा माणूस आहे. तुमच्या तोंडावर एक आणि तुमच्या पाठीमागे वेगळे बोलायचं असे मी करत नाही. जर तुम्ही गेल्या ३०-३५ वर्षांमधील माझ्या गोष्टी ऐकल्या तर तुम्हालाही वाटेल की आता या लोकांना सुद्धा संधी दिली पाहिजे आणि या ८०-८५ वर्षाच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचे किंवा सल्ला देण्याचे काम केले पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे, असे पवार म्हणाले आहे. यामुळे याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!