Ajit Pawar : ‘घोडगंगा ‘ बंद पाडला म्हणणाऱ्यांचा व्यंकटेश कसा सुरू आहे? मला कारखाना बंद पाडायचा असता, तर व्यंकटेश पण बंद पाडला असता, माझी बदणामी करु नकोस, अजित पवार यांचा अशोक पवारांना सवाल…


Ajit Pawar शिक्रापूर : ‘घोडगंगा’ बंद केला म्हणून माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक चकाटी उठविली जात आहे. वास्तविक मी कारखान्याला ३५ कोटी कर्ज मिळून दिले आहे. घोडगंगा बंदचीआरवणी उठविणाऱ्यांनी व्यंकटेश कसा चालू आहे, घोडगंगा मला बंद करायचा असता तर व्यंकटेश बंद केला असता, असे स्पष्टीकरण देऊन घोडगंगा बंद होण्यात आपला राजकीय संबंध जोडला जात असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशोक पवार यांचे नाव न घेता दिले आहे.

सणसवाडी (ता. शिरूर) येथील जन सन्मान यात्रेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अशोक पवार यांच्यावर टीका केली आहे. घोडगंगा ‘ बंद म्हणणाऱ्यांचा व्यंकटेश कसा सुरू आहे, मला कारखाना बंद पाडायचा असता, तर व्यंकटेश पण बंद पाडला असता, कारखाना बंद केला म्हणून माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक चकाटी उठविली जात आहे. वास्तविक मी कारखान्याला ३५ कोटी कर्ज मिळून दिले आहे, असे म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांच्यावर टीका केली आहे. Ajit Pawar

अजित पवार म्हणाले, भिमाशंकर कारखान्याने चांगला भाव दिला आहे. पुणे जिल्हा बॅंक माझ्या नेतृत्वात योग्य पध्दतीने चालली आहे. माझ्या ताब्यातील सहकारी संस्था पारदर्शक चालत आहे. मग घोडगंगा कारखाना माझ्यामुळे बंद झाल्याची चकाटी शिरूरमध्ये उठवली जात आहे. मी घोडगंगा सुरू ठेवण्यासाठी नुकतेच ३५ कोटी दिले आहेत.

तरीही मी कारखाना बंद पाडला असेल तर व्यंकटेश साखर कारखाना का बंद पडला नाही असे म्हणत पवार यांनी आमदार अशोक पवार नामोल्लेख टाळत कोपरखळी मारली व अनुभव नसलेल्या मुलाला कारखाना अध्यक्ष केल्यामुळे ही दुर्वस्था झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हा महिलाध्यक्ष मोनिका हरगुडे, आरती भुजबळ, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, घोडगंगा संचालक दादा पाटील फराटे,बाबासाहेब फराटे, राजेंद्र जगदाळे, शशिकांत दसगुडे, सुधीर फराटे, राजेंद्र कोरेकर, स्वप्नील ढमढेरे, विठ्ठलराव ढेरंगे, चंदन सोंडेकर, शांताराम कटके, राजाराम गव्हाणे, शरद कालेवर, शिवाजी दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!