Ajit Pawar : …म्हणून मी भाजपसोबत गेलो!! सत्तेत गेल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी केला मोठा खुलासा


Ajit Pawar : भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष..मात्र सध्या हे दोन्ही पक्षांची युती आहे. अजित पवार यांनी शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे.

 मी भाजपसोबत….

आमची विकासाची कामं करण्यासाठी राज्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राचा निधी आणण्यासाठी भाजपसोबत गेलो आहे. देश पातळीवर टाकली तर दोन तीन लोकांची नावे पंतप्रधानपदाची नावे सांगा.

त्यातील एक मोदी साहेब आहेत. अनेकदा एकत्र बसले. म्हणतात आपण नंतर ठरवू. आपण कुणाच्या हाती सूत्रे देणार आहोत हे जनतेला समजायला नको, असं अजित पवार म्हणाले आहेत. Ajit Pawar

देशपातळीवर मोदींसारखा नेता पाहायला मिळत नाही. पूर्वी नेते पाहायला मिळायचे. नितीश कुमार यांना मर्यादा असून ममता बॅनर्जी या बंगालपुरत्याच मर्यादित आहे. जरी केजरीवाल हे दिल्ली पंजाब पुरते असले तरी त्यांना गोव्याने स्वीकारलं नाही.

चंद्राबाबू आंध्रात समाधानी आहे. फारूख अब्दुल्ला जम्मू काश्मीरपर्यंत मर्यादित आहे. मी मोदींकडे बघून निर्णय घेतला. ते विकास पुरुष आहे. मीही आधी टीका केली, असंही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!