Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवार यांना १०१ इतका ताप, डेंग्यूची लागण, प्रकृती ढासळली, डॉक्टरांची माहिती..


Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय काकोटे यांनी अजित पवार यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे.

अजित पवार यांना १०१ इतका ताप आहे. त्यांना प्रचंड विकनेस जाणवतोय. त्यांना त्यांच्या घरीच सलाईन लावली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशीदेखील कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उद्या त्यांच्या प्लेट्सलेटबाबतची महत्त्वाची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. Ajit Pawar

डॉक्टर संजय काकोटे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली. अजित पवार यांना गेल्या पाच दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली आहे.

तसेच अजित दादांना गेल्या चार-पाच दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली होती. एनएसवन टायटन स्ट्राँगली पॉझिटिव्ह आहे. आतासुद्धा त्यांना १०१ इतका ताप आहे. असे देखील त्यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!