Ajit Pawar : महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण?; अजित पवारांनी दिले यांनी मोठे संकेत, म्हणाले, महायुतीचा मुख्यमंत्री…


Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

अशात आता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याची चर्चा होत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केले आहे. अजित पवार करणार वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या बैठका झाल्या. त्यात मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली का? महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सरकार आल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल ते आम्ही ठरवू, असे अजित पवार म्हणाले. Ajit Pawar

दरम्यान, आज दोन-तीन बैठक घेतल्या. पीएमपीएमएल कर्मचारी सातवं वेतन आयोगाचा फरक द्यायचा आहे. कामगारांच्यामध्ये अस्वस्थता होती. आज बैठक घेऊन आम्ही मार्ग काढला आहे.

मागच्या वेळेस चे वेतन सुद्धा द्यायचा निर्णय झाला. पुण्यातील भागात अनेक ठिकाणी पाणी गेलं. सगळ्या त्या पूरग्रस्तांना आज चेक दिला. डीबीटी पण त्यांना करण्यात आलं आहे, असे अजित पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!