Ajit Pawar : बदलापूर प्रकरणात अजित पवार यांच्या वक्तव्याने खळबळ! म्हणाले, माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानाच काढले पाहिजे…


Ajit Pawar :  बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

याप्रकरणात बदलापूरकर रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली. यंत्रणा कामाला लागली. आता यवतमाळ येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात या प्रकरणात अजितदादांचा संताप दिसून आला.

राज्यात महिलांवर, मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानाच काढले पाहिजे, असे वक्तव्य, असा संताप त्यांनी व्यक्त केला. परत नाहीच, हे केलचं पाहिजे, असे नालायक काहीही लोक आहेत. Ajit Pawar

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवले आहे. कशापद्धतीने आज काही लोक नालायकपणा करत आहेत. आज कुठे कुठे काही काही घटतंय, त्याच्याबद्दल कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे. विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने जो काय विरोध करायचा तो करा . लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही, असे अजितदादा म्हणाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!