Ajit Pawar : मी जोपर्यंत बारामतीचे नेतृत्व करतोय, तोपर्यंत कोणाची गुंडगिरी चालवू देणार नाही, अजित पवारांचा थेट इशारा…


Ajit Pawar : मी बारामतीचे नेतृत्व करतोय, तोपर्यंत कोणाचीही दादागिरी,गुंडगिरी चालू देणार नाही. माझ्या जवळचा एखादा कार्यकर्ता चुकलेला असला तरी त्याच्यावर ॲक्शन घेणार त्याला पाठीशी घातले जाणार नाही. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामती शहरातील जिजाऊ भवन या ठिकाणी व्यापारी व मर्चंट असोसिएशन च्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले, मी बारामतीचे नेतृत्व करतोय, तोपर्यंत कोणाचीही दादागिरी,गुंडगिरी चालू देणार नाही. माझ्या जवळचा एखादा कार्यकर्ता चुकलेला असला तरी त्याच्यावर ॲक्शन घेणार त्याला पाठीशी घातले जाणार नाही. मध्यंतरी काहींचं माझ्या कानावर आलं.

मी तात्काळ पोलिसांना सांगितलं, उचला त्यांना आणि त्यांची तुरुंगात रवानगी करा.आता त्यांना मोका लागला आहे. त्यामुळे बारामतीत कोणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. बारामतीकर म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. दोन नंबरचे धंदे करून कुणी काही केलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकणार नाही. कुणीही वेडे वाकडे प्रकार करू नये.आता डायरेक्ट चक्की पिसिंग. असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. Ajit Pawar

पुढे बोलताना पवार म्हणाले, कायदा सुव्यवस्था फार महत्त्वाची जबाबदारी आहे. परवा जे टी. सी. कॉलेजमध्ये घडलं, हे माझ्याही मनाला पटलं नाही. यात तुमचंही मला सहकार्य हवं आहे. कुठे काही घडल तर सांगा तुमचं नाव गुप्त ठेवतो. पोलीस खात्यालाही सुचना दिल्या आहेत. जबाबदार नागरिक म्हणून काही आपली पण जबाबदारी आहे. असा स्पष्ट इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!