Ajit Pawar : डॉक्टरांचे बिल बघून अजित दादांची सटकली, 16 लाखांचे बिल आणलं 4 लाखांवर, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार काल बारामती दौऱ्यावर होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सध्या अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. यावेळी बोलताना आपण लोकांना कशा प्रकारे मदत करतो, याबाबत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. अजित पवार म्हणाले, आपल्या तालुक्यातील एकाने दादा आपल्याला दवाखान्यात 9 लाखांचे बिल केले आहे, ते निम्मे करायला सांगा असे सांगितले, मी फोन केला असता ते बिल त्या डॉक्टरने 16 लाख केले व निम्मे कमी करून 9 लाख भरण्याचे त्या रुग्णाला सांगितले.
हा प्रकार अजित पवारांच्या लक्षात येताच त्यांनी त्या डॉक्टरला फोन करून चांगलेच झापलं. जास्त मस्ती आली का? मी जर मनात आणलं तर हॉस्पिटल बंद करेल, असा दम त्यांनी भरला. Ajit Pawar
यामुळे डॉक्टर चांगलाच घाबरला त्याने हे बिल थेट 4 लाखांवर आणले, याबाबत त्याने हे काम दादांना सांगितले होते तो देखील यावेळी उपस्थित होता. यामुळे अजित पवार यांनी भर सभेत त्याचे नाव देखील घेतले.
अशी कामे करायला दुसरं कोणीही येणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मागे उभे राहण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. त्यांनी यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील जोरदार टीका केली.