Ajit Pawar : विधानपरिषदेत बारामतीची कसर दादांनी भरून काढलीच, काकांना दिला धक्का…
Ajit Pawar : काल विधान परिषदेचा निकाल लागला. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीनं बाजी मारली. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला.
विधानपरिषदेच्या निवडणूकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं. दादांनी मतांची कमतरता असताना देखील दुसरा उमेदवार दिला, आणि त्यांचे दोन्ही उमेदवार विजयी ठरले आहेत.
राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांचा अनुक्रमे २३ आणि २४ मते मिळवत विजय झाला आहे. खरंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे ४२ मते होती, त्यांनी जवळपास ४ मतांची गरज होती. ही मते दादांनी काँग्रेसची मतं फोडत मिळवली असल्याचे बोलले जात आहे. Ajit Pawar
तर तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार शेकापच्या जयंत पाटलांनी अवघी बारा मत मिळाली आहेत, खरंतर लोकसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर हा विजय अजित पवारांसाठी महत्वाचा होता. त्यामुळे कुठेतरी अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना यामुळे बुस्टर डोस मिळाला, असे म्हणावं लागेल.