Ajit Pawar : विधानसभेत अजित पवारांनी क्रिकेटर सूर्याला भरला दम! म्हणाले, तुला बघितलच असतं, नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर पाठ थोपटली. वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियामधील महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आज सत्कार झाला.

या कार्यक्रमामध्ये फायनल सामन्याला कलाटणी देणारा ठरलेल्या सुर्याच्या कॅचवरून सर्वांनी जोरदार बॅटींग केली. या कॅचवर सूर्या बोलला की तो कॅच हातात बसला. यानंतर रोहितसह अजित पवारांनी त्याची चांगली फिरकी घेतली.
सूर्या बोलला की तो कॅच हातात बसला पण यावर रोहित शर्मा म्हणाला, बर झालं तो बॉल हातात बसला नाहीतर पूढे तर त्याला बसवलं असतं, त्यानंतर सभागृहात सर्वजण हसू लागले.

सूर्याचा कॅच त्यावर रोहितची प्रतिक्रिया याची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर भाषणासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीपण रोहितच्या वक्तव्याचा धागा पकडत त्याची फिरकी घेतली. Ajit Pawar
भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागले होते. पण जर कॅच सुटला असता तर रोहितने एकट्याने नाहीतर आम्ही सर्वांनी तुला बघितलं असतं, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. आपल्याकडे खिलाडूपणा पाहायला मिळत नसल्याचंही दादांनी सांगितलं.
दरम्यान, या कार्यक्रमात रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जयस्वाल यांना राज्य शासनाने १ कोटी बक्षील म्हणून दिले. इतकंच नाहीतर टीम इंडियालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी ११ कोटी देण्याची घोषणा केली.