Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का! सख्खा भाऊ म्हणाला तुझं सगळं ऐकलं पण आता नाही, बारामतीतील ‘या’ भाषणाची दिल्लीत चर्चा…

Ajit Pawar : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबत कितीजण आहेत आणि शरद पवार यांच्यासोबत कितीजण आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. तसेच पवार कुटुंबातही शरद पवार यांच्या बाजूने काहीजण आहेत.
तर अजित पवार यांच्याबाजूने काहीजण आहेत. मात्र, अजित पवार यांच्या सख्ख्या भावानेच त्यांची साथ सोडली आहे. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण भाजपसह जाण्याचा निर्णय मान्य नाही असे सांगत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
बारामतीमधील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधतांना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले. भाऊ म्हणून तुझे सगळे ऐकले, पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे.
यावेळी बोलतांना श्रीनिवास पवार म्हणाले की, तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की मी दादांच्या विरोधात कसा?, मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादांची माझी चर्चा झाली, त्यावेळेस मी त्याला म्हंटले आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्या वरती उपकार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत. Ajit Pawar
जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. ज्यांना कुणाला काही पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाले. साहेबांना म्हणायचे कीर्तन करा, घरी बसा हे काय मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे.
माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले (भरणेंना टोला), औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचे नाही. मला दबून जगायचे नाही, जगायचे तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत त्यांच्यामागे जायचं मला वाटत नाही, असे श्रीनिवास पवार म्हणाले.