अजित पवार माळेगावचे चेअरमन झाले पण त्यांची निवड बेकायदेशीर? महत्वाची माहिती आली समोर…

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी विराजमान झाले आहेत. असे असताना विरोधी संचालक चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाली.
असे असताना मात्र नियुक्ती होण्याआधीच चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांच्या नावावरती हरकत घेतली. ‘ब’ वर्ग गटातील व्यक्तीला चेअरमन होता येत नाही. असा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे. असा दाखला त्यांनी दिला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तसेच अजित पवारांची नियुक्ती केल्याने चंद्रराव तावरे यांनी नियमाप्रमाणे कामकाज करावे असे म्हणत, बैठकीतून काढता पाय घेतला. यावेळी अजित पवारांची निवड ही बेकायदेशीर असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले. आज याबाबत निवड प्रक्रिया पार पडली.
यामध्ये व्हा. चेअरमनपदी संगीता कोकरे यांची निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांनी आधीच सांगितले होते की, मीच माळेगावचा चेअरमन होणार आहे. यामुळे त्यांना 21 पैकी 20 जागा मिळाल्या तसेच विरोधकांना केवळ एक जागा मिळाली.
असे असले तरी विरोधी गटाचे चंद्रराव तावरे आणि रंजन काका तावरे यांच्या पॅनलने जोरदार टक्कर दिली. यामुळे अजित पवार यांना याठिकाणी ठाण मांडून थांबावे लागले. याठिकाणी जोरदार टक्कर बघायला मिळावी.