दौंडच्या तहसीलदारपदी अजित दिवटे, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय..


दौंड : दौंडच्या तहसीलदारपदी निवासी नायब तहसीलदार अजित दिवटे यांची बदली झाली आहे. दौंडचे तहसीलदार संजय पाटील व आंबेगावचे तहसीलदार रमा जोशी यांची १३ एप्रिल रोजी बदली करण्यात आली होती.

असे असताना मात्र त्यांनी पदाचा पदभार सोडला नसल्याने त्यांच्या जागी नवीन तहसीलदार यांची नियुक्ती केली गेली नसल्याने तेच कामकाज पाहत होते. तसेच आंबेगाव तालुका तहसीलदार पदी जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे अतिरिक्त पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे.

याबाबत पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आदेश दिले आहेत. तसेच जुन्नर चे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे आंबेगाव च्या तालुका तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

त्यांच्या जागी नवीन अधिकारी यांची नेमणूक होईपर्यंत व पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी नुकताच जारी केला आहे. त्यांचे कामकाज कसे असणार हे आता लवकरच समजेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!