Ahmednagar News : मोठी बातमी! खासदार निलेश लंके यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला, राज्यात खळबळ…


Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेवार निलेश लंके हे जायंट किलर ठरले. निकालानंतर आता दोन दिवसांनी अहमदनगरमध्ये मोठा राडा झाला आहे.

राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती आहे.

निलेश लंके यांच्या जवळच्या माणसावर सुजय विखे पाटील समर्थकांकडून प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती आहे. यामुळे खळबळ उडालीय. राहुल झावरे यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर पारनेर येथे जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. Ahmednagar News

या हल्ल्यानंतर राहुल झावरे यांच्यावर पारनेरच्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.तसेच त्यांना नगर येथे खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आज सकाळी विखे समर्थक असलेले पारनेर येथील विजय सदाशिव ओटी यांच्या एका समर्थकाला सोशल मिडीयावर निलेश लंके यांच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून लंके समर्थक राहुल झावरे व कार्यकर्त्यांनी पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे मारहाण केली होती.

या मारहाणीनंतर राहुल झावरे व कार्यकत्ते पारनेर येथे आले असता विखे समर्थक असेलेले विजय ओटी यांनी राहुल झावरे व कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या मारहाणीत राहुल झावरे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने अहमदनगरमध्ये एकच खळबळ माजली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!