अहिल्यादेवी होळकर जयंतीवरुन राजकारण तापले, रोहित पवारांनी मध्यरात्रीच काढली मिरवणूक..

अहमदनगर : जिल्ह्यातील चौंडी येथे आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत.

असे असताना आता जयंती साजरी होत असताना सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट पडल्याचे दिसते. होळकर जयंती समितीचे अध्यक्ष भाजप आमदार राम शिंदे आहेत. यावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आली आहे.
शासकीय कार्यक्रमात एकीकडे स्वागत अध्यक्ष भाजप आमदार राम शिंदे यांनी सकाळी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काल मध्यरात्रीत पूजा करुन मिरवणूक काढली.

बुधवारी सकाळी साडेपाच वाजता शासकीय कार्यक्रमांना सुरुवात होणार होती. मात्र, रोहित पवार यांनी मध्यरात्री जयंती उत्सवाला सुरुवात केली. यामुळे भाजप त्यांच्यावर निशाना साधत आहे.
Views:
[jp_post_view]