वाघनख्यानंतर आणखी एक इतिहास महाराष्ट्रात, रघुजीराजे भोसलेंची लंडनमधील तलवार हस्तांतरित…


नागपूर : आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाघनख्यानंतर आता मराठा साम्राज्यातील आणखी एक मौलिक आणि ऐतिहासिक ठेव महाराष्ट्रात येणार आहे. नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची तलवार लंडनमधून सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

ही तलवार राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे लंडनमध्ये सुपूर्त करण्यात आली. यामुळे हा एक अभिमानाचा क्षण आहे 16  ऑगस्टपर्यंत राजे रघुजी भोसलेंची  ही तलवार मुंबईत दाखल होणार  आहे. यामुळे ही सर्वांना बघता येणार आहे. सरकारने ही तलवार 47. 15 लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती.

याबाबत आशिष शेलार यांनी माहिती दिली असून शेलार म्हणाले, तमाम महाराष्ट्राला सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की, नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन ताब्यात घेण्यात आला.

महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थीने हा लिलाव जिंकला होता. त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून त्याच्या कायदेशीर बाबी पुर्ण करुन आज ॲड आशिष शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. यामुळे लवकरच ही तलवार महाराष्ट्रात दाखल करण्यात येणार आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचने प्रमाणे आशिष शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला. यामुळे याबाबत सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून ही तलवार महाराष्ट्रात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!