उरुळी कांचन परिसरात छोटे मोठे चोरींचे सत्र संपून बड्या चोऱ्यांकडे चोरटे शिरले! थेट फॉर्च्युरच लंपास! पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचा मुद्दा ऐरणीवर..!

उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल, घरफोडी, दिवसाढवळ्या महिलांचे ऐवज, रात्रीच्या वेळेस घरफोडी या घटना कुठे कमी न पडताच आता चोरट्यांनी मोठे डल्ले मारण्यात सुरुवात केली आहे. चोरट्यांनी आता पोलिसांची सुरक्षितीतेची लक्तरेच बाहेर काढत, आता थेट फॉर्च्युनरच उरुळीकांचन ग्रामपंचायत हद्दीतून लंपास करण्याची करामत केली आहे.
उरुळी कांचन (ता. हवेली) शहरातून आता फॉर्च्युनरच लंपास झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.५) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याप्रकरणी सागर पोपट कांचन (रा.उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कांचन यांनी नेहमीप्रमाणे त्यांची फॉर्च्युनर गाडी (क्र. MH १२ PH ०१०५) नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता.४) रात्री घराच्या पर्किंमध्ये पार्क केली होती. दरम्यान, सागर कांचन यांना सकाळी उठल्यावर त्यांच्या पर्किंमधील फॉर्च्युनर गाडी आढळून आली नाही.
त्यानंतर सागर कांचन यांनी सीसीटीव्ही तपासले असता, शुक्रवारी मध्यरात्री २ च्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी फॉर्च्युनर गाडीचे कशानितरी लॉक उघडले आहे. चोरटे गाडी घेऊन पळून गेले.
याप्रकरणी सागर कांचन यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रमेश गायकवाड करीत आहेत.