गॅसनंतर पेट्रोल डीझेलच्या दरात होणार मोठी कपात.? जाणून घ्या आजचे दर…

नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. परंतु, भाव मात्र कमी झालेला नाही. सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन इंधन खरेदी करावे लागत आहे.
अगोदरच महागाईने होरपळलेल्या नागरिकांच्या खिशावर आर्थिक ताण येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ठरवल्या जातात.
देशातील तेल कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करत असतात. वास्तविक डीलर कमिशन, एक्साईज ड्युटी, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
तुमच्या शहरातील दर जाणून घ्या..
पुणे – पेट्रोल १०५.८५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.३७ रुपये प्रति लिटर
मुंबई – पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
रत्नागिरी – पेट्रोल १०७.६६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.११ रुपये प्रति लिटर
कोल्हापूर – पेट्रोल १०६.४७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९३.०० रुपये प्रति लिटर
गोंदिया – पेट्रोल १०७.५६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.०५ रुपये प्रति लिटर
नाशिक – पेट्रोल १०६७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९३.१९ रुपये प्रति लिटर
नागपूर – पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.५९ रुपये प्रति लिटर