Aditya Thackeray : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होणार, दिशा सालियान प्रकरणी अडचणीत वाढ
Aditya Thackeray : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिचा ८ जून २०२० ला रोजी मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, दिशाने आत्महत्या केली होती. पण, तिची हत्या झाली असा संशय व्यक्त करत आरोप करण्यात आला होता. Aditya Thackeray
तसेच याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा अशी मागणी देखील नितेश राणे यांनी केली. त्यानंतर नागपूरच्या मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आता राज्य सरकार दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी करणार आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.