आदिल दुर्रानीने केले राखी सावंतचे मोठे गुपित उघड; म्हणाला, तिने माझा न्यूड व्हिडीओ…

मुंबई : बी-टाऊनची ड्रामा क्वीन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. असा एकही दिवस नसतो की, ड्रामा क्वीन चर्चेत येत नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री यावेळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

लग्नानंतर काही दिवसांनी राखी सावंत आणि तिचा पती आदिल दुर्रानीमध्ये तभेद सुरू झाले. राखीने आदिलवर खूप गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर पोलिसांनी आदिलला अटक केली होती. नुकताच आता तो तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर येताच त्याने राखीवर काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

आदिल म्हणाला, राखी मला ड्रग्स देऊन माझे न्यूड व्हिडीओ तयार करत होती. ज्यावेळी आमची ओळख झाली तेव्हा राखी माझ्यासमोर खूप चांगले राहत होती. मला तिच्याबद्दल कसलीच माहिती नव्हती.
परंतु राखी बिग बाॅस मराठीमध्ये गेल्यानंतर मला तिच्याबद्दल काही पुरावे मिळाले, असा आरोप आदिलने केला आहे. त्यावर आता राखी कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अभिनेत्री राखी सावंतने २९ मे २०२२ रोजी आदिल खानशी लग्न केले होतं आणि तेव्हापासून आदिल तिला नेहमी मारहाण करत असे असं तिने सांगत आदिलवप गंभीर आरोप केले होते. अगदी आदिलने राखीकडून दीड कोटी रुपये घेतले होते.
राखीने आदिलवर अभिनेत्रीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे. आता संपुर्ण प्रकरणात पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.