अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे निधन, ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

पुणे : महसूल प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी, पीएमआरडीएच्या अपर जिल्हाधिकारी स्नेहल रवींद्र बर्गे (वय-४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात्य बहीण आणि आई असा परिवार आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या स्नेहल बर्गे यांनी हवेली तालुक्याच्या प्रांतधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते. ती त्यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. अवैध गौणखजिना उत्खनन, वाहतूक यावर त्यांनी कठोर कारवाई केली होती.
अर्धन्यायीक अपील प्रकरणे विहित मुदतीत मार्गी लावली होती. त्यानतंर अपर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी पीएमआरडीएचा कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या आई भारती बर्गे या डॉक्टर, तर बहीण पल्लवी बर्गे या जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
Views:
[jp_post_view]