भारताच्या स्टार क्रिकेटरसोबत अभिनेत्री रश्मिकाने उरकलं लग्न? बॉलीवूडमध्ये चर्चा सुरू….


मुंबई : भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे, या फोटोमध्ये दोघंही विवाहबद्ध झाल्यासारखे दिसत आहेत.

गळ्यात हार, रश्मिकाच्या कपाळावर कुंकू आणि दोघंही एकमेकांकडे बघताना दिसत आहेत. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला. सोशल मीडियावर हार्दिक आणि रश्मिका यांनी लग्न केलं का?, असा प्रश्न विचारला जात आहे.

तर, काही युजर्सनी त्यांना थेट लग्नाबद्दल शुभेच्छाही दिल्या. पण या सगळ्यामागचं सत्य काय आहे? यावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘hamid786.2011’ नावाच्या एका इंस्टाग्राम पेजवरुन हा फोटो शेअर करण्यात आला होता.

त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की हार्दिक आणि रश्मिकाने लग्न केलं असून सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्याव्यात. त्यानंतर अनेक इंस्टाग्राम पेजवर तो फोटो झपाट्याने शेअर होऊ लागला. सुरुवातीला अनेक सोशल मीडियाच्या युजर्सने हा फोटो शेअर करताना हा फोटो खरा असल्याचे सांगितले आणि दाव्याचा आधार दिला की हार्दिक आणि रश्मिका यांचा विवाह झाला आहे. पण ‘टीम सजग’ने या व्हायरल फोटोची तथ्य तपासणी केली आणि ते बनावट असल्याचे सिद्ध केले.

दरम्यान, तपासणीनुसार, हार्दिक आणि रश्मिका यांच्या लग्नाबद्दल कोणताही अहवाल गूगलवर किंवा त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध नव्हता. त्यानंतर एआय टूलच्या सहाय्याने या फोटोची तपासणी केली. फोटो एका वेबसाइट ‘isitai.com’ वर प्रथम अपलोड करण्यात आला होता. त

पासणीनुसार, हा फोटो ९९% एआय द्वारा जनरेट केलेला असू शकतो. यामुळे हे सिद्ध झाले की हार्दिक पांड्या आणि रश्मिका मंदानाच्या लग्नाचा फोटो एक बनावट अफवा आहे, जो एआयच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!