कार्यकर्त्यांनो दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या वर्गणीसाठी आता घ्यावी लागणार परवानगी, अन्यथा होणार कारवाई…


पुणे : दहिहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता वर्गणी गोळा करणाऱ्या सर्व मंडळांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे मंडळाचे अध्यक्ष, खजिनदार, कार्यकर्ते यांना याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच सण-उत्सवांची रेलचेल सुरू होणार आहे. सार्वजनिक सणासाठी वर्गणी गोळा करताना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा, 1950 अंतर्गत कलम 41 (क) नुसार ही परवानगी घेणे आवश्यक आहे.

यामध्ये आता नोंदणी नसलेली मंडळे – अशा मंडळांनी प्रत्येक सणासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून तात्पुरती परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी ६ महिन्यांपर्यंत वैध असते. तसेच नोंदणीकृत मंडळे – यांना वर्गणीसाठी वेगळी परवानगी लागणार नाही. त्यांना दरवर्षी हिशोबपत्रक आणि आर्थिक माहिती ऑनलाइन दाखल करणं बंधनकारक आहे.

यामुळे येणाऱ्या काळात याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. या निर्णयामुळे आर्थिक शिस्त निर्माण होईल. परवानगी घेण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागतो. स्टॅम्प, मंडळाचा ठराव, दोन पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र (आधार / पॅन) जागा मालकाचे NOC, पत्ता पुरावा (वीज बिल), मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास त्याचा आदेश व हिशोब द्यावा लागणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!